शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशात 2026 पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 16:26 IST

bullet train : जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे. याशिवाय, 199 स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी अहमदाबाद दौऱ्यावर असताना बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. तसेच, सध्या बुलेट ट्रेनचे ट्रॅक 92 पिलर तयार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे. याशिवाय, 199 स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशातील सर्व रेल्वे ट्रॅक अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे गुरांचा प्रश्न कायम आहे. मात्र, अशा समस्यांना तोंड देण्यासाठी गाड्यांचे डिझाइन तयार केले जात आहेत. कालच्या घटनेनंतरही वंदे भारत ट्रेनला काहीच झाले नाही. पुढचा भाग दुरुस्त केल्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली आहे.

मुंबईहून गांधीनगरला जाणारी देशातील पहिली हाय-स्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरुवारी अहमदाबादपूर्वी बटवा आणि मणिनगर दरम्यान एक म्हैस धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रेनचा पुढील भाग तुटला आहे. आता ही गाडी पूर्णपणे दुरुस्त करून परत आणण्यात आली आहे. काल सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. वंदे भारत एक्सप्रेस सध्या फक्त तीन मार्गांवर धावत आहे.

गुजरातमध्ये तयार होणार 5G लॅब  गुजरातमध्ये 5G लॅब तयार केली जाईल, असे अहमदाबादमध्ये अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, अश्विनी वैष्णव हे आयटी आणि दूरसंचार मंत्रीही आहेत. नुकतेच त्यांनी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये सांगितले होते की, देशात 5G टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 100 लॅबची स्थापना करण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किमान 12 लॅबचा वापर केला जाणार असून इतर प्रयोगशाळांचा वापर नवीन प्रयोगांसाठी केला जाणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनrailwayरेल्वे