शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Video: 'अमृत भारत एक्सप्रेस'च्या पायलट सीटवर रेल्वेमंत्री; आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 17:18 IST

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणपतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे.

रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतीमान आणि वातानुकूलित रेल्वेसेवाचा आनंद घेण्यासाठी प्रवासी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच, वंदे भारत ट्रेनलाही प्रवाशांची गर्दी होत आहे. बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या भारत देशात वंदे भारतनंतर आता अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. दिल्ली ते दरभंगा मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या ते बिहारमधील सीतामढी मार्गास ही ट्रेन जोडणार आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणपतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील दळणवळण गतीमान केलं जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील नवीन विमानतळाचे उद्घाटन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमृत भारत रेल्वेलाही व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे. वंदे भारत ट्रेनप्रमाणेच ही ट्रेनही सुसज्ज आणि प्रशस्त बैठकव्यवस्थेची असणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनमधील सुविधांचा आणि ही ट्रेन आतमधून कशी आहे, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या तो व्हिडिओ प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. अयोध्या ते सीतामढी म्हणजेच रामजन्मभूमी ते सीतामातेच्या गावाला जोडणाऱ्या ह्या ट्रेनला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असणार आहे. गोरखपूर-मुजफ्फरनगर मार्गावरुन ही ट्रेन दिल्ली ते दरभंगा अशी धावणार आहे. सध्या रेल्वेकडून या रेल्वेमार्गाच्या थांब्याबाबत आणि प्रवास भाड्याबाबत चर्चा सुरू आहे. नुकतेच अमृत भारत ट्रेनची यशस्वी चाचणी झाली असून दिल्ली ते दानापूर मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. या ट्रेनमध्ये २२ कोच असून १८३४ प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतात. या रेल्वेचा स्पीड प्रति तास १३० किमी असणार आहे. दरम्यान, सध्या भगव्या रंगात आणि ग्रे कलरमध्ये ही ट्रेन बनवण्यात आली आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवdelhiदिल्लीAyodhyaअयोध्या