रेल्वे गेटमनला मारहाण

By Admin | Updated: November 15, 2015 23:14 IST2015-11-15T23:14:30+5:302015-11-15T23:14:30+5:30

बाळापूर :- मनारखेड येथील रेल्वे गेटमनला मोटारसायकल स्वाराने मारहाण करून जीवे मारण्याची घमकी दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

Railway Gaitman beat up | रेल्वे गेटमनला मारहाण

रेल्वे गेटमनला मारहाण

ळापूर :- मनारखेड येथील रेल्वे गेटमनला मोटारसायकल स्वाराने मारहाण करून जीवे मारण्याची घमकी दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
मारोती दिपके हे गेटमन रेल्वेगेटवर रात्री ड्यूटी करीत होते. रेल्वे गेट बंद असताना एक मोटारसायकलस्वाराने तेथे आला. तो बळजबरी मोटारसायकल गेटमधून घेऊन जात होता. यावेळी मोटारसायकल चालकाने दिपके यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर दिपके यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी एमएच-३०- ऐपी- ८९४९ या क्रमांकाच्या चालकाविरुद्ध भादंविचे कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा आणणे), ३३२, १८६, ५०६ खाली गुन्हा दाखल केला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Railway Gaitman beat up