शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 'या' 30 ट्रेन्स रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 12:42 IST

रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हरिद्वार आणि लक्सर रेल्वे ट्रॅकवर काम सुरू आहे.अंबाला ते हरिद्वार जाणाऱ्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसणार आहे.

नवी दिल्ली - सुट्टीच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर एकदा रेल्वेचं वेळापत्रक नक्की पाहा. कारण रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. हरिद्वार आणि लक्सर रेल्वे ट्रॅकवर काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाचे काम लवकर व्हावे यासाठी या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेने 30 ट्रेन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबाला ते हरिद्वार जाणाऱ्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसणार आहे. मात्र रुळाचे काम पूर्ण झाल्यावर या रेल्वे पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहेत. मुरादाबाद विभागामार्फत हरिद्वार ते लक्सर दरम्यान रेल्वेरुळाचे डबल करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अंबालाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी हरी मोहन यांनी दिली आहे. 

'या' ट्रेन्स करण्यात आल्या रद्द 

- ट्रेन नंबर 12054 अमृतसर हरिद्वार एक्सप्रेस ट्रेन 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- बीकानेर हरिद्वार 14 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

-  ट्रेन नंबर 24888 अंबाला छावनी ते ऋषिकेश डेली 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

-  ट्रेन नंबर 14606 जम्मू ते हरिद्वार 13 ते 20 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14632 अमृतसर ते देहरादून डेली 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 19019 वांद्रे देहरादून डेली 15 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

-  ट्रेन नंबर 14610 कटरा ऋषिकेस डेली 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- उज्जैन देहरादून 16 आणि 17 ऑक्टोबर रद्द.

- ट्रेन नंबर 12017 नवी दिल्ली ते देहरादून डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14317 इंदौर देहरादून 19 ते 20 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 54341 सहारनपूर देहरादून डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

 - ट्रेन नंबर 12053 हरिद्वार ते अमृतसर एक्स्प्रेस 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14718 हरिद्वार ते बीकानेर 15 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 24887 ऋषिकेस ते अंबाला छावनी डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14605 हरिद्वार ते जम्मू 14 ते 19 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14631 देहरादून ते अमृतसर डेली 17 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 19020 देहरादून वांद्रे डेली 17 ते 23 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14609 ऋषिकेस ते कटरा डेली 17 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14310 देहरादून, उज्जैन 15 आणि 16 ऑक्टोबर रद्द. 

- ट्रेन नंबर 14318 देहरादून इंदौर 17 आणि 18 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 12018 देहरादून नवी दिल्ली डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

-  ट्रेन नंबर 54342 देहरादून सहारनपूर डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14712 श्री गंगानगर हरिद्वार ते अंबाला को 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

 - ट्रेन नंबर 12687 मंदुरई-देहरादून निजामुद्दीन 13 ते 19 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

- ट्रेन नंबर 14711 हरिद्वार श्रीगंगा नगर ते अंबाला कँट 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे