शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Railway Accident: बालासोरनंतर ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात, मालगाडीखाली सापडून सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 22:21 IST

Railway Accident In Odisha: बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर ओडिशामध्ये आणखी एक विचित्र रेल्वे अपघात घडला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार एका मालगाडीखाली सापडून सहा मजुरांचा मृत्यू झाला.

बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर ओडिशामध्ये आणखी एक विचित्र रेल्वे अपघात घडला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार एका मालगाडीखाली सापडून सहा मजुरांचा मृत्यू झाला. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. जाजपूर रोड रेल्वेस्टेशनजवळ उभ्या एका मालगाडीचे काही डबे अचानक घसरले आणि त्याखाली सहा मजूर चिरडले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार या मालगाडीला इंजिन नव्हते. तसेच ती सेफ्टी ट्रॅकवर उभी करण्यात आली होती. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, जोराचा वारा वाहत होता. त्यादरम्यान हे मजूर ट्रेनच्या डब्याखाली आडोशाला गेले. हे मजूर रेल्वेच्या कामावर आले होते.  एका अधिकाऱ्याने सांगितले की, मजूर पावसापासून बचावासाठी उभ्या राहिलेल्या मालगाडीखाली थांबले होते. मात्र अचानक विनाइंजिनची मालगाडी धावली आणि हे मजूर तिच्याखाली सापडले.

रेल्वेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, अचानक वादळी वारे वाहू लागले.मजूर बाजूच्या रेल्वे लाईनवर काम करत होते. तिथे एक मालगाडी उभी होती. हे मजूर तिच्याखाली लपले. मात्र ही मालगाडी अचानक हलली, त्यामुळे हा अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी झाले. दरम्यान, या जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये २८८ जणांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :AccidentअपघातOdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वेOdisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात