शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी 'ही' मार्गदर्शक तत्त्वे वाचा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:28 IST

rail passengers are requested to read the health advisory guidelines issued by different states before journey : सोमवारी रेल्वे मंत्रालयाने एका ट्विट करत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संकटामुळे बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा आता हळूहळू पुन्हा रुळावर येत आहे. रेल्वे सेवा सुरू होताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र, पुन्हा कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे लोकांची चिंता आणखी वाढली आहे. (rail passengers are requested to read the health advisory guidelines issued by different states before journey)

याच पार्श्वभूमीवर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचा सल्ला भारतीय रेल्वेकडून लोकांना देण्यात येत आहे. आता सोमवारी रेल्वे मंत्रालयाने एका ट्विट करत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेने काय म्हटले आहे?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना विनंती आहे की, प्रवासापूर्वी विविध राज्यांनी दिलेल्या आरोग्य सल्लागार मार्गदर्शक तत्त्वे वाचा, असे रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशातील बर्‍याच राज्यांत आढळल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता बर्‍याच राज्यांत पुन्हा कोरोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच, नाईट कर्फ्यू लागू केला आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्यात येत आहे.

अलीकडे, पूर्व मध्य रेल्वेने दिल्ली-मुंबई ते बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सल्ला जारी केला आहे.  यामध्ये असे म्हटले आहे की, मुंबई किंवा देशातील इतर राज्यांतून बिहारला येत आहेत. त्यांनी फक्त थर्मल स्कॅनिंगच करायची नाही तर या  सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रवासापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची बाब...ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवासी ज्या राज्यात जात आहेत, त्या राज्यातील मार्गदर्शक तत्त्वे वाचून पाहिली पाहिजेत, असे ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. यावेळी प्रत्येक राज्यात राज्य सरकारकडून वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. काही राज्यात प्रवेशासाठी  RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखविणे बंधनकारक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनासोबत सर्वांनी मिळून लढण्यासाठी असे करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे