रेल्वे भाडेवाढ बजेटपूर्वी

By Admin | Updated: June 20, 2014 02:58 IST2014-06-20T02:58:19+5:302014-06-20T02:58:19+5:30

रेल्वे प्रवास भाडेवाढ आणि रेल्वेत थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा निर्णय रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी (बजेट) घेण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Before the rail fare budget | रेल्वे भाडेवाढ बजेटपूर्वी

रेल्वे भाडेवाढ बजेटपूर्वी

>नवी दिल्ली : रेल्वे प्रवास भाडेवाढ आणि रेल्वेत थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा निर्णय रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी (बजेट) घेण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे.
या विषयावर चर्चा सुरू आहे. यावरील निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे रेल्वेमंत्री सदानंद गौडा म्हणाले. आम्ही या विषयावर विचार करीत आहोत. तीन-चार दिवसांत निष्कर्षावर पोहोचू, असे गौडा रेल्वे भाववाढीबद्दल म्हणाले. ते वरिष्ठ रेल्वे अधिका:यांच्या परिषदेत बोलत होते. 
गौडा रेल्वे भाडेवाढीवर चर्चा करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
रेल्वे बोर्डाकडे रोख रकमेचा प्रचंड तुटवडा आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी प्रवासभाडे 14.2 टक्के आणि मालभाडे 6.5 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे अर्थसंकल्प जुलैच्या दुस:या आठवडय़ात सादर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वेत एफडीआयला परवानगी देण्यात येईल काय, अशी विचारणा केली असता, गौडा म्हणाले, आपल्याकडे संसाधनांची कमतरता आहे. ही बाब सा:या जगाला माहीत आहे. त्यामुळे काही संसाधन प्राप्त करण्याला रेल्वेचे प्राधान्य आहे. मला वाणिज्य मंत्रलयाशी विचारविनिमय करायचा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: Before the rail fare budget