रेल्वे भाडेवाढीवर देशभरात संताप
By Admin | Updated: June 22, 2014 02:12 IST2014-06-22T02:12:43+5:302014-06-22T02:12:43+5:30
कानपूर येथे रेल्वेमंत्र्यांच्या पुतळ्य़ांचे दहन करून रोष व्यक्त केला़सरकारने रेल्वे भाडेवाढ त्वरित मागे न घेतल्यास देशभर रेल्वे रोको करण्याचा इशारा काँग्रेसने दिला़

रेल्वे भाडेवाढीवर देशभरात संताप
>काँग्रेसचा रेल रोकोचा इशारा : ठिकठिकाणी निदर्शने, मोदींचे पुतळे जाळले, रेल्वेमंत्र्यांचा निषेध
नवी दिल्ली : रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात 14.2 टक्के तर मालभाडय़ात 6.5 टक्के वाढ करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध आज शनिवारी देशभर ठिकठिकाणी काँग्रेस, माकपासह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरल़े समाजवादी पार्टी कार्यकत्र्यानी वाराणसीत तर हैदराबादमध्ये कम्युनिस्ट कार्यकत्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि काँग्रेस कार्यकत्र्यानी कानपूर येथे रेल्वेमंत्र्यांच्या पुतळ्य़ांचे दहन करून रोष व्यक्त केला़सरकारने रेल्वे भाडेवाढ त्वरित मागे न घेतल्यास देशभर रेल्वे रोको करण्याचा इशारा काँग्रेसने दिला़
राजधानी दिल्लीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरविंदरसिंह लवली, माजी खासदार महाबल मिश्र यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकत्र्यानी जनकपुरी भागात रेल्वे भाडेवाढीविरुद्ध तीव्र निदर्शने केली़ पोलिसांनी निदर्शकांना रेल्वे भवनपूर्वी भारतीय प्रेस क्लबनजीक रोखून धरले आणि त्यांना पांगविण्यासाठी पाण्याचा मारा केला़
या वेळी बोलताना लवली यांनी रेल्वेभाडेवाढीच्या निर्णयासाठी मोदी सरकारची तीव्र शब्दांत निंदा केली़ निवडणुकीपूर्वी भाजपाने लोकांना चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले होत़े मात्र निवडणूक जिंकताच या सरकारचे खरे रूप समोर आल़े आता हे सरकार अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचा कांगावा करीत लोकांनी कठोर निर्णय स्वीकारण्यास सज्ज राहण्याचे सांगत आहे, असे लवली म्हणाल़े माकपा कार्यकत्र्यानीही दिल्लीत रेल्वे भवनबाहेर रेल्वे भाडेवाढीविरुद्ध निदर्शने केली़ काँग्रेस व डाव्यांच्या या निदर्शनांमुळे मध्य दिल्लीत मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली़ वाराणसी येथे सपा कार्यकत्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केल़े अलाहाबादेत लखनौकडे निघालेली गंगा-गोमती एक्स्प्रेस सपा निदर्शकांनी अर्धा तास रोखून धरली़ तसेच काशी स्थानकावर सरकारविरोधी जोरदार नारेबाजी केली़ भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा)ने रेल्वे प्रवासी भाडे व मालभाडेवाढीविरुद्ध येत्या 25 जूनला बिहारात ‘विरोध दिन’ पाळण्याची घोषणा केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुंबईकर आक्रमक; डबेवालेही सहभागी
च्नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीविरोधात मुंबईत शनिवारी ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. ‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखविणा:या सरकारने ‘बुरे दिन’ कसे काय दाखविले, असा सवाल करीत काँग्रेससह मुंबईच्या डबेवाल्यांनीही या रेल्वे भाडेवाढीविरोधात संताप व्यक्त केला.
च्मुंबईकरांना लोकलमधून डबे पोचते करणा:या डबेवाल्यांनी या रेल्वे भाडेवाढीविरोधात जोरदार आवाज उठविला. लोअर परळ स्थानकावर निदर्शने करीत भाडेवाढीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी डबेवाल्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
च्विरार-चर्चगेट डबेवाल्याला मासिक पासामागे 365 रुपये, बोरिवली-चर्चगेट 29क् रुपये आणि दादर-चर्चगेट मासिक पासामागे 215 रुपये एवढी वाढ होईल, असे डबेवाल्यांचे म्हणणो आहे. त्यामुळे ही भाडेवाढ परवडणारी नाही, असे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे सुभाष तळेकर यांनी सांगितले.