होटगी-तिलाटी दुहेरीकरणाचे काम सुरू रेल विकास निगम : होटगी-गुलबग्र्याच्या कामावर 2 सप्टेंबरला सुनावणी
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:18+5:302015-08-27T23:45:18+5:30
सोलापूर : निकृ ष्ट काम आणि अन्य मुद्यांवरुन होटगी - गुलबर्गा दुहेरीकरणाचे काम थांबले असले तरी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ने या मार्गावर होटगी-तिलाटी मार्गाचे काम ‘एशियन डेव्हलपमेंट फंड’मधून सुरू करण्यात आले आह़े

होटगी-तिलाटी दुहेरीकरणाचे काम सुरू रेल विकास निगम : होटगी-गुलबग्र्याच्या कामावर 2 सप्टेंबरला सुनावणी
स लापूर : निकृ ष्ट काम आणि अन्य मुद्यांवरुन होटगी - गुलबर्गा दुहेरीकरणाचे काम थांबले असले तरी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ने या मार्गावर होटगी-तिलाटी मार्गाचे काम ‘एशियन डेव्हलपमेंट फंड’मधून सुरू करण्यात आले आह़े होटगी-गुलबर्गा या 98 कि़मी़ दुहेरीकरणाचे काम हे 2012 साली ‘एपीआरव्हीएनआर- ज़ेव्ही़’ या हैदराबादच्या कंपनीला देण्यात आला होता़ या कामाची मुदत ही 42 महिन्यांची असून ती डिसेंबर 2015 मध्ये संपत़े या काळात दुहेरीकरणाचे काम केवळ 20 टक्केच पूर्ण झाले; मात्र ठेके दाराकडून काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार रेल विकास निगम लिमिटेडने गुलबर्गा जिल्हा न्यायालयात दाखल केली होती़ या कंपनीकडून सुरक्षित अनामतपोटी 16 कोटींची रक्कमही कंपनीने भरली आह़े मात्र न्यायालयात प्रकरण गेले आणि या कामाला ‘खो’ बसला़ 8 जून रोजी दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद झाला आणि रेल विकास निगम या कंपनीकडून आर्थिक दंड वसूल करु नये म्हणून ‘परिस्थिती जैसे थे’ असा निकाल हा थोड्या काळापुरता दिला़ त्यामुळे हा निकाल रेल विकास निगम लिमिटेडसाठी नि:संदिग्ध असा ठरला़ त्यानंतर होटगी-अक्कलकोट दुहेरीकरणाचे काम दुसर्या ठेके ाराकडून करुन घ्यावे का? अशी विचारणा केली असता यावर गुलबर्गा न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले नाहीत.यावर 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आह़े (प्रतिनिधी)होटगी-तिलाटीचे काम तीन महिन्यात होणार पूर्णसध्या 98 कि़मी़च्या दुहेरीकरणाचे काम न्यायालयीन प्रकरणामुळे रखडले असले तरी यापैकी होटगी-तिलाटीचे काम हे एशियन डेव्हलपमेंट फंडातून अन्य ठेके दारांकडून रेल विकास निगम लिमिटेड करवून घेत आह़े हे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याची अट संबंधित कंपनीला घालण्यात आली आह़े