शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात उभारणार रेल कोच कारखाना, २०० एकर जागेवर उभारला जाणार प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 04:45 IST

रेल कोच कारखाना स्थापन करण्यासाठी तेलंगणा सरकार लवकरच उद्योग संघासोबत समझोता करार करणार आहे, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

हैदराबाद : रेल कोच कारखाना स्थापन करण्यासाठी तेलंगणा सरकार लवकरच उद्योग संघासोबत समझोता करार करणार आहे, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. तथापि, त्यांनी या संदर्भात अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. विधानसभेचे अधिवेशन २७ आॅक्टोबरपासून सुरू होत असल्याने, करारावर स्वाक्षरी करण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. कारण या क्षेत्रात आद्यप्रवर्तक असलेल्या काही उद्योगांसमवेत या संदर्भात करार करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. कराराची तारीख अद्याप ठरविण्यात आलेली नाही. बहुधा पुढच्या आठवड्यात करार होईल. विधानसभा अधिवेशनाच्या वेळापत्रकावर हे अवलंबून आहे, असे या अधिकाºयाने सांगितले. काझीपेठ येथे रेल कोच कारखाना उभारण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले असले, तरी मूर्त स्वरूपात या अनुषंगाने कोणतीही प्रगती झालेली नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाºयांशी या मुद्द्यावर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलेकी, या कारखान्यासाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारने मात्र रेल्वेकडे जमीन हस्तांतरित केलेली नाही. 200 एकर जागेत हा कारखाना उभारला जाणार आहे. अलीकडेच रेल्वेच्या अधिकाºयांची उपमुख्यमंत्री कदियाम श्रीहरी यांच्यासोबत या मुद्द्यांवर चर्चाही झाली आहे. जमीन हस्तांतरित झाल्यानंतरच पुढची कार्यवाही सुरू करता येईल, असे रेल्वेच्या अधिकाºयाने सांगितले. कारखान्याचे ठिकाण, किती गुंतवणूक होणार यासह इतर तपशील करार स्वाक्षरी करतेवेळी घोषित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.