तिस्ता सेटलवाडांच्या कार्यालयावर छापे
By Admin | Updated: July 15, 2015 02:35 IST2015-07-15T02:35:20+5:302015-07-15T02:35:20+5:30
सबरंग कम्युनिकेशन्स आणि त्याच्या संचालिका तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या कार्यालयासह मुंबईतील तीन ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या

तिस्ता सेटलवाडांच्या कार्यालयावर छापे
मुंबई : सबरंग कम्युनिकेशन्स आणि त्याच्या संचालिका तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या कार्यालयासह मुंबईतील तीन ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) १६ जणांच्या तुकडीने मंगळवारी छापे घातले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आणि नोंदणी न करता विदेशातून देणग्या स्वीकारल्याबद्दल सीबीआयने ८ जुलै रोजी सबरंग कम्युनिकेशन्सविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट करणे आणि विदेशी साह्य नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपांना पुष्टी देणारी काही महत्त्वाची कागदपत्रे या छाप्यात हाती लागल्याचे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद म्हणाले की, सीबीआयने सबरंग कम्युनिकेशन्स अँड पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक जावेद आनंद, तिस्ता सेटलवाड, पेशीमम गुलाम महमंद आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम १२० (बी), त्यातील विदेशी चलन नियमन कायदा, २०१० चे कलम ३५, ३७, त्यात कलम ३,११ आणि १९ ते विदेशी चलन नियमन कायदा, १९७६ चे कलम २३,२५ मधील कलम ४,६ आणि १३ अन्वये दाखल झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी न घेता विदेशी साह्य बेकायदेशीरपणे स्वीकारून गुन्हेगारी स्वरूपाचा कट केल्याचा हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तिस्ता सेटलवाड यांनी पूर्ण सहकार्य करण्याबाबतचे पत्र सीबीआयला लिहिले होते आणि जे तथाकथित गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या चौकशीत आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही त्यात म्हटले होते. म्हणूनच ही छाप्यांची सगळी कारवाई आमच्या आकलनशक्तीबाहेरची आहे, असे सेटलवाड म्हणाल्या. हा राजकीय सूड असून, त्यातून आमचा अपमान करण्याचा व आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला. (प्रतिनिधी)

छाप्यांमुळे धक्का
तिस्ता सेटलवाड यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले, की चौकशीसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे आम्ही न्यायालयाला आधीच सांगितलेले असतानाही टाकण्यात आलेल्या छाप्यांमुळे आम्हाला धक्का बसला आहे.