एसटीच्या १७ आगारातील डिझेल पंपांवर छापे
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:38+5:302015-09-03T23:05:38+5:30
वैधमापनशास्त्र विभागाची कारवाई : बीड, अमरावती आगारातील पंप बंद

एसटीच्या १७ आगारातील डिझेल पंपांवर छापे
व धमापनशास्त्र विभागाची कारवाई : बीड, अमरावती आगारातील पंप बंदमुंबई : एसटी आगारात असणार्या डिझेल पंपांवर वैधमापन शास्त्र विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. यात राज्यातील १७ आगारातील डिझेल पंपांवर छापा टाकण्यात आला. यामध्ये एसटी गाड्यांना डिझेल पुरवताना नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने बीड व अमरावती आगारातील डिझेल पंप बंद करण्यात आले असून डिलर्सविरोधात गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे वैधमापनशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.एसटी महामंडळाची २५० आगारे असून सर्व आगारात डिझेल पंप आहेत. मात्र हे डिझेल बसगाड्यांना पुरवताना काही नियम धाब्यावर बसवण्यात येतात. तसेच कमी प्रमाणात डिझेल बसना देण्यात येत असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाला मिळाली आणि त्यानुसार राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, भंडारा,चंद्रपूर या १७ आगारांत छापे टाकण्यात आले. त्या वेळी अमरावती आणि बीड आगारातील डिझेल पंप दोषी आढळले. ते सध्या बंद करण्यात आले असल्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी सांगितले..................................