सिंडिकेट बँकेच्या 1 हजार करोड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी

By Admin | Updated: March 8, 2016 16:26 IST2016-03-08T16:26:41+5:302016-03-08T16:26:41+5:30

सिंडिकेट बँकेच्या कथित 1 हजार करोड घोटाळ्याची केंद्रीय गुप्तचर विभागा (सीबीआय) चौकशी करत आहे. सीबीआयने याप्रकरणी आज जयपूर, उदयपूर आणि दिल्लीतील 10 ठिकाणांवर छापेमारीदेखील केली

Raid on Syndicate Bank's 1000 Crore Cram Case | सिंडिकेट बँकेच्या 1 हजार करोड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी

सिंडिकेट बँकेच्या 1 हजार करोड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ८ - सिंडिकेट बँकेच्या कथित 1 हजार करोड घोटाळ्याची  केंद्रीय गुप्तचर विभागा (सीबीआय) चौकशी करत आहे. सीबीआयने याप्रकरणी आज जयपूर, उदयपूर आणि दिल्लीतील 10 ठिकाणांवर छापेमारीदेखील केली. खोटी बिल आणि खोट्या जीवन बिमा योजना दाखवत हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 
 
सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये बँकेच्या शाखा आणि कर्मचा-यांच्या निवासस्थानांचादेखील समावेश आहे. सीबीआयचे प्रवक्ते देवप्रीत सिंग यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. सिंडिकेट बँकेकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. 
 
याअगोदरही सिंडिकेट बँक वादात राहिली आहे. दीड वर्षापुर्वी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) एस कै जैन यांना 50 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. एस कै जैन यांनी काही कंपन्यांना कर्जाची रक्कम वाढवून देण्यासाठी लाच मागितली होती. लाच घेत असतानाच सीबीआयने त्यांना अटक केली होती. 
 

 

Web Title: Raid on Syndicate Bank's 1000 Crore Cram Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.