माझ्या घरावर छापा मारा, फक्त मफलर सापडतील
By Admin | Updated: December 27, 2015 18:01 IST2015-12-27T17:59:35+5:302015-12-27T18:01:51+5:30
दिल्ली सचिवालयाप्रमाणे सीबीआयने माझ्या घरावर छापा मारला तर त्यांना असंख्य मफलर शिवाय काही हाती लागणार नाही.

माझ्या घरावर छापा मारा, फक्त मफलर सापडतील
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्ली सचिवालयाप्रमाणे सीबीआयने माझ्या घरावर छापा मारला तर त्यांना असंख्य मफलर शिवाय काही हाती लागणार नाही असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. रिक्षा परवाना घोटाळयात तीन अधिका-यांच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या घोटाळयाचा तपास सीबीआयकडे देण्यात येईल असे केजरीवालांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाने माझ्या कार्यालयावर छापे मारण्यात आले. असेच छापे त्यांनी माझ्या घरावर मारले तर, त्यांना असंख्य मफलर सोडून काही मिळणार नाही. केजरीवाल यांना सर्दीचा भरपूर त्रास आहे. त्यामुळे बहुतेकवेळा त्यांनी गळयाभोवती मफलर गुंडाळलेली असते.
त्यामुळे मफलर ही अरविंद केजरीवालांची एक ओळखही बनली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुक प्रचाराच्यावेळी आम आदमी पक्षाने मफलर मॅन परतला अशी एक प्रचार मोहिमही राबवली होती.