शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

सिसोदिया प्रकरणी मुंबईत छापेमारी, मनी लॉंड्रिंगच्या संशयामुळे सीबीआयनंतर आता ईडीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 06:59 IST

सन २०२१-२२ मध्ये दिल्ली सरकारने जे मद्यासंबंधित उत्पादन शुल्क धोरण निश्चित केले (जे आता रद्द केले) त्या धोरणात सहभागी / लाभार्थी असलेले मद्याचे व्यापारी, वितरक आणि मध्यस्थ यांच्या घर, दुकाने, कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे. 

मुंबई : दिल्ली सरकारच्या कथित उत्पादन शुल्क धोरण गैरव्यवहार प्रकरणात आता ईडीने एंट्री घेतली असून, मंगळवारी मुंबई, दिल्ली, चेन्नई, चंडीगडसह देशभरात सुमारे ४० ठिकाणी छापेमारी केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आरोपी असलेल्या या कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी सीबीआयने गुन्हा नोंदविल्यानंतर आता ईडीनेदेखील गेल्या शुक्रवारी मनी लॉड्रिंगचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. सन २०२१-२२ मध्ये दिल्ली सरकारने जे मद्यासंबंधित उत्पादन शुल्क धोरण निश्चित केले (जे आता रद्द केले) त्या धोरणात सहभागी / लाभार्थी असलेले मद्याचे व्यापारी, वितरक आणि मध्यस्थ यांच्या घर, दुकाने, कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे. यात सिसोदिया हेदेखील आरोपी आहेत. मात्र, त्यांच्याशी संबंधित कोणत्याही ठिकाणी छापेमारी झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्या एफआरआयनुसार, मनीष दिल्लीचे तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त आरव गोषीकष्णन, उपायुक्त आनंद तिवारी, सहायक आयुक्त पंकज भटनागर यांनी संगनमताने काही विशिष्ट लोकांना लाभ मिळेल, अशा पद्धतीने धोरण अमलात आणल्याचा आरोप आहे. 

सरकारी तिजोरीचे १४४ कोटींचे नुकसान? -- चुकीच्या पद्धतीने धोरण तयार करीत त्याची अंमलबजावणी केल्यामुळे सरकारी तिजोरीचे १४४ कोटी ३६ लाखांचे नुकसान झाल्याचेही सीबीआयचे म्हणणे आहे. १५ जण यामध्ये आरोपी आहेत. - या लोकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांची फिरवाफिरवी झाली असल्याचा सीबीआयचा संशय आहे. हाच धागा पकडत आता ईडीने मनी लॉंड्रिंगच्या अनुषंगाने तपास सुरू करीत छापेमारी केली आहे.- या प्रकरणी मनी लॉंड्रिंग झाल्याचा ईडीला संशय असून, त्या अनुषंगाने आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय