लखनौ - उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले गायत्री प्रजापती यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. खाण घोटाळ्याप्रकरणी ईडीने गायत्री प्रजापती यांच्या अमेठी येथील घरावर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये एकूण ११ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय ईडीला पाच लाख रुपयांचे साधे स्टॅम्प पेपर, दीड लाख रुपयांची रोख रक्कम आणि शंभरहून अधिक निनावी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली.समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये खाणमंत्री राहिलेल्या गायत्री प्रजापती यांच्या अमेठी येथील निवासस्थान आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता. खाण घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेली ही छापेमारी बराच वेळ सुरू होती. यामध्ये ईडीला बरीच कागदपत्रे मिळाली.ईडीला जी कागदपत्रे सापडली त्यामधून गायत्री प्रजापती यांची लखनौ, कानपूर, मुंबई, सीतापूरसह सहाहून अधिक शहरांमध्ये संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसेच ही संपत्ती त्यांनी खाणींच्या माध्यमातून कमावल्याचा दावा करण्यात येत आहे.
माजी मंत्र्याच्या घरावर छापा, ११ लाखांच्या जुन्या नोटा, कोट्यवधीच्या १०० निनावी संपत्तीची कागदपत्रे जप्त
By बाळकृष्ण परब | Updated: December 31, 2020 11:04 IST
Gayatri Prajapati News : समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये खाणमंत्री राहिलेल्या गायत्री प्रजापती यांच्या अमेठी येथील निवासस्थान आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता.
माजी मंत्र्याच्या घरावर छापा, ११ लाखांच्या जुन्या नोटा, कोट्यवधीच्या १०० निनावी संपत्तीची कागदपत्रे जप्त
ठळक मुद्देछाप्यामध्ये एकूण ११ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्याईडीला पाच लाख रुपयांचे साधे स्टॅम्प पेपर, दीड लाख रुपयांची रोख रक्कम आणि शंभरहून अधिक निनावी मालमत्तांची कागदपत्रे मिळालीवादग्रस्त राहिलेले गायत्री प्रजापती सध्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात आहेत