भुयार खोदून बँकेवर दरोडा

By Admin | Updated: October 28, 2014 10:12 IST2014-10-28T01:26:49+5:302014-10-28T10:12:19+5:30

सोनिपत जिल्ह्यातील गोहाना येथे दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला.

Raid on the bank by digging up the bay | भुयार खोदून बँकेवर दरोडा

भुयार खोदून बँकेवर दरोडा

रोहतक (हरियाणा):  सोनिपत जिल्ह्यातील गोहाना येथे दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ाने पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.
सोमवारी दरोडा उघडकीस आला असला तरी दरोडेखोरांनी शनिवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेर्पयत चोरीची मोहीम फत्ते केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. स्ट्राँगरूममधील 360 पैकी 90 लॉकर्स चोरटय़ांनी फोडल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक देविंदर मलिक यांनी दिली. हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील गोहाना हे गाव चंदीगडपासून 200 कि.मी. अंतरावर आहे. 2007 मध्ये केरळमधील एका बँकेत अशी धाडसी चोरी झाली होती.
गोहानातील जुन्या बसस्थानकाजवळील पंजाब नॅशनल बँकेला लागून असलेल्या इमारतीतून चोरटय़ांनी 2.5 फूट रुंदीचा भुयारी मार्ग खोदला होता. शनिवारी बँक बंद झाल्यानंतर रात्री चोरटय़ांनी शेजारच्या इमारतीतून भुयार खोदण्यास सुरुवात केली. इमारतीतील दोन खोल्यांमध्ये भुयारातील माती टाकली. खोलीच्या खिडक्या कागदांनी झाकल्यामुळे आत काय सुरू आहे, हे कोणालाही कळले नाही. कदाचित हे भुयार खोदण्यासाठी महिना लागला असावा. त्यासाठी ब:याच काळापासून नियोजन केले असावे, असा कयास आहे. (वृत्तसंस्था)
 
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी
गेल्या काही दिवसांमध्ये बँकेत काही लोकांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या काय, हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासले जात असल्याचे गोहानाचे पोलीस उप-अधीक्षक राजीव देशवाल यांनी सांगितले. मात्र स्ट्राँगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. बँक लुटण्यात आल्याच्या बातमीने या परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी बँकेसमोर दिवसभर गर्दी केली होती.
‘धूम’चा असाही इतिहास
 केरळच्या मलाप्पुरम येथील दुस:या मजल्यावरील दक्षिण मलबार ग्रामीण बँकेत प्रवेश करण्यासाठी चोरटय़ांनी इमारतीचा एक मजला फोडला होता व 8क् किलो सोने लुटले होते. त्याची अंदाजे किंमत आठ कोटी होती. पोलिसांनी सूत्रधाराला तातडीने अटक करीत सोने आणि रोकड मिळविली होती. चोरटय़ांनी ‘धूम’ चित्रपटापासून प्रेरणा घेतल्याचा दावा केला होता.

 

Web Title: Raid on the bank by digging up the bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.