राहुला महाशिवरात्र उत्सहात सा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30
जरी

राहुला महाशिवरात्र उत्सहात सा
ज ी राहु। दि.१७(वार्ताहर)राहु (ता. दौंड) येथे हर हर महादेवाच्या गजरात ग्रामस्थांच्या वतीने जलाभिषेक घालण्यात आला. गेली दोन वर्षापासुन प्रति भिमा शंकर म्हणुन ओळखले जाणार्या राहु येथील शंकराच्या मंदिरात महाशिवरात्रीचे औचित्य साधुन महादेवाची यात्रा सुरु करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मुळा मुठा नंदीच्या पात्रातुन मानाच्या कवडीतील घागरीत पाणी भरुन मोठ्या आनंदाने ही कावड महादेवाच्या मंदिरात नेली या ठिकाणी महादेवाला जलाभिषेक घालण्यात आला तर ग्रामस्थांनी एकमेकाला पर्यावरण पुरक रंग लावले. पहाटे पासुनच महादेवाच्या मंदिरात विविध धार्मीक कार्यक्रम झाले. कावडीच्या कार्यक्रमा नंतर भजनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. येथील ग्रामदैवत शंभु महादेवाच्या मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. फोटो ओळ:- राहु (ता. दौंड) येथील महादेवाच्या मंदिरात महादेवाला जलाभिषेक घालण्यासाठी भाविकांनी आणलेली मानाची कावड (छाया: सखाराम शिंदे)17022015-िं४ल्लि-13-----------------