शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल यांचे मोदींना थेट सवाल

By admin | Updated: December 29, 2016 00:46 IST

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला कोंडीत पकडण्याची पूर्ण योजना आखल्याचे

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला कोंडीत पकडण्याची पूर्ण योजना आखल्याचे दिसत असून, त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना नोटाबंदीसंदर्भात पाच सवाल केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी देतील वा नाही, हे माहीत नाही. मात्र या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना अवघड आहे, हे मात्र नक्की.पश्चिम बंगालमध्ये नोटाबंदीच्या आधी भाजपने कोट्यवधी रुपये बँकांत जमा केले होते. या पार्श्वभूमीवर राहुल यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नांची उत्तरे देणेही मोदी यांच्यासाठी सोपे नाही. मोदी कायमच राहुल यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण जनतेलाही या प्रश्नांच्या उत्तरात खूपच रस आहे. या प्रश्नांच्या निमित्ताने राहुल यांनी, नोटाबंदीमुळे रांगेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने भरपाई दिली का? नसेल तर का नाही? असाही सवाल केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयासाठी कोणकोणत्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली होती त्यांची नावे जाहीर करावीत, असेही राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी अशी मागणी केली की बँकेतून २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा मागे घेण्यात यावी. त्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत किमतीवर २० टक्के बोनस द्यावा, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना २५ हजार रुपये द्यावेत, मनरेगाचे कामाचे दिवस आणि मजुरी दुप्पट करण्यात यावी. स्वीस बँकेत भारतीयांच्या खात्यांचा खुलासा संसदेत मोदी कधी करणार आहेत? असा सवाल करून ते म्हणाले की, मोदी नावे जाहीर करीत नाहीत कारण त्या लोकांना ते संरक्षण देऊ इच्छितात.राहुल यांनी पंतप्रधानांना विचारलेले प्रश्न- आठ नोव्हेंबरनंतर किती काळा पैसा बाहेर आला?- ८ नोव्हेंबरच्या रात्री जेवढ्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या, तेवढ्याच बँकांमध्ये पुन्हा जमा झाल्या आहेत, अशी रिझर्व्ह बँकेचीच आकडेवारी आहे. हे खरे आहे का?- नोटाबंदीमुळे देशाचे किती नुकसान झाले, किती लोकांना रोजगार गमवावा लागला? - देशात नोटाबंदीमुळे किती लोकांचा जीव गेला?ं- ८ नोव्हेंबरच्या आधी तीन महिने अर्थात ८ आॅगस्ट ते ८ नोव्हेंबर दरम्यान कोणी कोणी बँकांमध्ये २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली त्यांची नावे काय आहेत?