मोदींच्या ‘कोटा’वर राहुल यांचे टीकास्त्र
By Admin | Updated: January 30, 2015 05:53 IST2015-01-30T05:53:55+5:302015-01-30T05:53:55+5:30
विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन पाळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले, परंतु त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

मोदींच्या ‘कोटा’वर राहुल यांचे टीकास्त्र
नवी दिल्ली : विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन पाळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले, परंतु त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी दहा लाख रुपये किमतीचा कोट घातला होता, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
नवी दिल्लीत एका निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी बोलत होते. मोदी सरकारने अणुकरारातील कोंडी फोडण्यासाठी अमेरिकेपुढे गुडघे टेकले आहेत. एखादा अपघात घडला तर अमेरिकन कंपनीला कोणतीही नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ‘मी कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा भारतात परत आणणार आणि प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, असे त्यांनी (मोदी) म्हटले होते. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला १५ लाख रुपये मिळाले आहेत काय? तुम्हाला काहीही मिळाले नाही. परंतु मोदींनी ओबामांच्या भारत दौऱ्याच्या वेळी दहा लाख रुपये किमतीचा कोट परिधान केला. (वृत्तसंस्था)