फुटीरवाद्यांच्या गडात राहुल यांचा नाश्ता

By Admin | Updated: August 28, 2015 23:52 IST2015-08-28T23:52:58+5:302015-08-28T23:52:58+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी श्रीनगरमधील फुटीरवाद्यांच्या आंदोलनाचे मुख्य स्थळ असलेल्या मैसुमा भागाला अचानक भेट दिली आणि तेथील एका स्थानिक दुकानावर

Rahul's breakfast in extremist castle | फुटीरवाद्यांच्या गडात राहुल यांचा नाश्ता

फुटीरवाद्यांच्या गडात राहुल यांचा नाश्ता

श्रीनगर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी श्रीनगरमधील फुटीरवाद्यांच्या आंदोलनाचे मुख्य स्थळ असलेल्या मैसुमा भागाला अचानक भेट दिली आणि तेथील एका स्थानिक दुकानावर जाऊन चहा व नाश्ताही घेतला. हे स्थळ लाल चौकाच्या अगदी जवळ आहे.
जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून नंतर राहुलजींनी लाल चौक येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या ताफ्याने जहांगीर चौकातून यू टर्न घेतला आणि ते मैसुमा चौक येथे थांबले,’ अशी माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जी. ए. मीर यांनी दिली.

Web Title: Rahul's breakfast in extremist castle