शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेसला अहंकार, ही राहुल यांनी दिलेली मोठी राजकीय कबुली - स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 13:02 IST

सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अहंकार चढला होता. त्यामुळे पराभव झाला हे काँग्रेस उपाध्यक्ष यांचे वक्तव्य म्हणजे त्यांनी दिलेली मोठी राजकीय कबुली आहे.

ठळक मुद्देदेशात पाठिंबा मिळत नाही, म्हणून राहुल गांधी परदेशातल्या भूमीवर आपल दु:ख, व्यथा सांगत आहेत. आपले पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे घराणेशाहीतून आलेले नाहीत.

नवी दिल्ली, दि. 12 - सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अहंकार चढला होता. त्यामुळे पराभव झाला हे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे त्यांनी दिलेली मोठी राजकीय कबुली आहे असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. राहुल गांधी यांनी मंगळवारी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. 

या टीकेचा समाचार घेताना स्मृती इराणी म्हणाल्या की, देशात पाठिंबा मिळत नाही, म्हणून राहुल गांधी परदेशातल्या भूमीवर आपल दु:ख, व्यथा सांगत आहेत. घराणेशाही देश चालवते असे राहुल गांधी म्हणतात, पण आपले पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे घराणेशाहीतून आलेले नाहीत याकडे स्मृती इराणींनी लक्ष वेधले. 

अमेरिकेत काय म्हणाले राहुल गांधीसंसद व मुख्य आर्थिक सल्लागारांना विचारात न घेता अंमलात आणलेल्या नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे.  यामुळे जीडीपीमध्ये घसरण झाल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणालेत. शिवाय, देशात सांप्रदायिक आणि ध्रुवीकरण करणा-या शक्ती डोकं वर काढत असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.  हिंसेमुळे मी माझ्या वडील, आजीला गमावलं आहे. मला माहिली आहे की हिंसेमुळे काय नुकसान होते. कोणत्याही व्यक्तीविरोधात हिंसा होऊ नये. जेव्हा तुम्ही जवळच्या माणसांना गमावता, तेव्हा तुम्हाला खोल जखमा होतात, असेही यावेळी राहुल गांधी म्हणालेत. 'हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरू आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,' या शब्दांमध्ये राहुल गांधींनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले.

...तर पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार - राहुल गांधी दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी पहिल्यांदाच म्हटले आहे की, पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे. शिवाय, 2012मध्ये काँग्रेस पक्षामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि पक्षानं जनतेशी संवाद कमी केल्याने लोकं दुरावली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.    

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत, जनतेला कसा संदेश द्यावा? याची त्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र ते भाजपा नेत्यांचंही कधी ऐकत नाहीत. स्वच्छ भारत एक चांगली कल्पना आहे, मलाही ती आवडली. आज रशिया पाकिस्तानला शस्त्रं विकत आहे, जे याआधी कधीही झाले नाही. नेपाळ, श्रीलंका, मालदीवमध्ये चीनचा दबदबा वाढत आहे. परदेश नीतीमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. अमेरिकेसोबत मैत्री करणं गरजेचं आहे मात्र दुस-या देशांसोबतही मैत्री करणं तितकंच गरजेचं आहे. 

टॅग्स :BJPभाजपा