राहुलना पदोन्नती मिळणार?

By Admin | Updated: February 26, 2015 02:04 IST2015-02-26T02:04:16+5:302015-02-26T02:04:16+5:30

काँग्रेस पक्षाच्या भविष्याबाबतच्या रणनीतीवर चिंतन करण्यासाठी सुटीवर गेलेले पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना येत्या एप्रिलमध्ये पदोन्नती देऊन पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.

Rahulina will get promotions? | राहुलना पदोन्नती मिळणार?

राहुलना पदोन्नती मिळणार?

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या भविष्याबाबतच्या रणनीतीवर चिंतन करण्यासाठी सुटीवर गेलेले पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना येत्या एप्रिलमध्ये पदोन्नती देऊन पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुलना पक्षाध्यक्ष बनविण्याचे समर्थन केलेले आहे. राहुल गांधींना पक्ष संघटनेची पूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली पाहिजे. पक्षात निर्णय घेणाऱ्या दोन संस्था नको, असे कमलनाथ यांनी म्हटले आहे. ‘राहुल यांना पक्षाध्यक्ष बनवा. राहुल गांधी काही तरी करीत आहेत, असे सोनिया गांधी यांना वाटते. तर सोनिया गांधी काही तरी करीत आहेत, असे राहुल गांधी यांना वाटते. जेथे राहुल गांधी हेच प्रमुख असतील, अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली पाहिजे,’ असे ते म्हणाले. सोनिया गांधी या १९९८ पासून काँग्रेसच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपणार आहे. येत्या एप्रिलमध्ये बेंगळुरू वा सिमला येथे काँग्रेसचे अधिवेश्न भरविण्यात येणार असून, त्यात राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष बनविले जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे अचानक सुटीवर जाणे हे त्यांची पदोन्नती होण्याची द्योतक असल्याचे मानले जाते. दरम्यान, राहुल गांधी राजकारणापासून पळ काढत असल्याचा आरोप दिग्विजयसिंग यांनी फेटाळून लावत ते आणखी व्यापक व मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी परत येतील, असे दिग्विजयसिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Rahulina will get promotions?