राहुल यांनी धुरा सांभाळावी!
By Admin | Updated: November 2, 2014 01:30 IST2014-11-02T01:30:54+5:302014-11-02T01:30:54+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाची धुरा आपल्या हाती घेण्याची वेळ आली आहे,

राहुल यांनी धुरा सांभाळावी!
दिग्विजयसिंगांचे मत : काँग्रेसने हात झटकले
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाची धुरा आपल्या हाती घेण्याची वेळ आली आहे, असे विधान करून काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी नव्या वादाला जन्म दिला आहे. हे दिग्विजयसिंग यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून काँग्रेसनेही त्यापासून स्वत:ला दूरच ठेवले आहे.
पत्रकारांशी बोलताना दिग्विजयसिंग म्हणाले, ‘काँग्रेसने पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी नेहमीच तरुण नेत्यांना प्रोत्साहित केलेले आहे, अशी काँग्रेस कार्यकत्र्याची सर्वसामान्य भावना आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घेण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते.’
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाबाबत विचारले असता, 2क्क्4 आणि 2क्14 दरम्यान काँग्रेसला मिळालेला विजयही लक्षात ठेवा, असे दिग्विजयसिंग म्हणाले. राहुल गांधींबाबतच्या केलेल्या याआधीच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता दिग्विजयसिंग म्हणाले, ‘कृपया माङो वक्तव्य पुन्हा बघा. जे सत्तेशिवाय जिवंतच राहू शकत नाहीत अशा नरेंद्र मोदींप्रमाणो राहुल गांधी हे सत्तेचे भुकेले नाहीत, असे मी म्हणालो होतो.’
दरम्यान, राहुल गांधींनी पक्षाची धुरा सांभाळली पाहिजे, हे दिग्विजयसिंग यांचे वैयक्तिक मत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, ‘दिग्विजयसिंगांनी जे काही सांगितले ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. पक्षसंघटन बळकट बनविण्याची वा देशहिताची गोष्ट येते तेव्हा काँग्रेस पक्षाने नेहमीच सामूहिक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. सोनिया गांधी काँग्रेससाठी प्रेरणास्नेत आहेत. राहुल गांधीदेखील पक्षासाठी प्रेरणा आणि पक्षाचे भविष्य आहेत.’ (प्रतिनिधी)