राहुल यांनी माफी मागावी -गडकरी

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T01:13:30+5:302015-07-25T01:13:30+5:30

ललित मोदी प्रकरणातील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची कृती ‘गुन्हेगारी कृत्य’ संबोधल्याबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध

Rahul should apologize - Gadkari | राहुल यांनी माफी मागावी -गडकरी

राहुल यांनी माफी मागावी -गडकरी

नवी दिल्ली : ललित मोदी प्रकरणातील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची कृती ‘गुन्हेगारी कृत्य’ संबोधल्याबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची धमकी भाजपने दिली.
‘राहुल गांधी ज्या शब्दांचा वापर करीत आहेत, ते शब्द अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीविरोधी आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांबद्दल असे अवमानजनक शब्द वापरल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. कारण त्यांचे हे वक्तव्य केवळ स्वराज यांचाच अवमान करणारे नाही, तर परराष्ट्रमंत्र्याचा अवमान करणारे आहे,’ असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Rahul should apologize - Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.