सपकाळ नॉलेज हबचा राहुल जाधवची आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल संघात निवड

By Admin | Updated: July 7, 2016 00:51 IST2016-07-06T22:20:52+5:302016-07-07T00:51:11+5:30

नाशिक : नेपाळ येथील पोखरा येथे होणार्‍या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात नाशिक अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबच्या स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अंतिम वर्षातला विद्यार्थी राहुल जाधव याची निवड झाली आहे. चीन, नेपाळ, भूतान व भारत या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेतर्फे नेपाळ येथील पोखरा येथे रंगशाळा स्टेडियमवर होणार्‍या स्पर्धत भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात राहुल जाधव याची निवड झाली आहे. या दक्षिण आशियायी संघटनेच्या या पहिल्या दक्षिण आशियायी स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय ग्रामीण ऑलिम्पिक असोसिएशनच्या विविध राज्यांतील निवड झालेल्या पथकाचे नेतृत्व नाशिक विभागातील नीलेश राणे (महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालक) आणि प्रेरण

Rahul Jadhav's selection in the International Volleyball team of Sakal Knowledge Hub | सपकाळ नॉलेज हबचा राहुल जाधवची आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल संघात निवड

सपकाळ नॉलेज हबचा राहुल जाधवची आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल संघात निवड

नाशिक : नेपाळ येथील पोखरा येथे होणार्‍या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात नाशिक अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबच्या स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अंतिम वर्षातला विद्यार्थी राहुल जाधव याची निवड झाली आहे. चीन, नेपाळ, भूतान व भारत या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेतर्फे नेपाळ येथील पोखरा येथे रंगशाळा स्टेडियमवर होणार्‍या स्पर्धत भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात राहुल जाधव याची निवड झाली आहे. या दक्षिण आशियायी संघटनेच्या या पहिल्या दक्षिण आशियायी स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय ग्रामीण ऑलिम्पिक असोसिएशनच्या विविध राज्यांतील निवड झालेल्या पथकाचे नेतृत्व नाशिक विभागातील नीलेश राणे (महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालक) आणि प्रेरणा राणे (महाराष्ट्र राज्य क्रीडा सचिव) हे करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालील संघ नेपाळ येथे १७ जुलै रोजी दाखल होणार आहे.
राहुल जाधवच्या या निवडीबद्दल हबचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सपकाळ, उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ, कॅम्पस डायरेक्टर आरिफ मन्सुरी, सपकाळ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विठ्ठल गोंड, एमबीए कॉलेजचे संचालक डॉ. सुहास धांडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सौदागर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. राजेश कासार आदिंच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. (वा.प्र.)

Web Title: Rahul Jadhav's selection in the International Volleyball team of Sakal Knowledge Hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.