शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

राहुल यांनी केला जनादेशाचा अपमान, जावडेकर यांचा प्रतिहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:37 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या भाष्यावर भाजपने दुस-या दिवशी जोरदार प्रतिहल्ला केला आहे.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या भाष्यावर भाजपने दुस-या दिवशी जोरदार प्रतिहल्ला केला आहे.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, विकासाला वेडे म्हणणारे विकासाच्या मॉडेलला समजून घेऊ शकत नाहीत. गांधी यांनी केलेले आरोप म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सतत पराभूत होत आहे व ते निराशेमुळे काहीही बोलत आहेत.गुजरातेत भाजपला झटका बसल्याची गांधी यांनी केलेली टीका म्हणजे ते त्यांच्या पक्षाच्या पराभवाला समजून घेऊ शकत नाहीत किंवा त्याची व्याख्या बदलू बघत आहेत, असे जावडेकर म्हणाले. हे जरत्यांना समजू शकत नसेल तरसुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी सांगितले. हरयाणा, जम्मू-काश्मीर, मणिपूर, आसाम, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगणमधील पराभवाचा दाखला देऊन जावडेकर म्हणाले की, गांधी पराभवालाच विजय म्हणत असतील, तर त्यांना असे यश लखलाभ होवो. पुढेही निवडणुका आहेत. त्यातही त्यांचा असाच पराभव होईल. फटका काँग्रेसला बसला हे त्यांनी समजून घ्यायला हवे.सत्तेच्या अहंकारामुळे काँग्रेसला पराभव दिसत नाही. गुजरातने स्पष्ट संदेश दिला आहे की विकास यात्रेपासून दूर जाऊ नका. गुजरात जातीयवादाच्या गाळात फसणार नाही. मोदी यांना पराभूत कसे करावे, हे काँग्रेस व राहुल गांधी यांना समजलेच नाही, असे जावडेकर म्हणाले.राफेलमध्ये क्वात्रोची नाही-राफेल विमान व्यवहारावर राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की हा व्यवहार बोफोर्सचा नाही तर राफेलचा आहे. हा करार भारत व फ्रान्स यांच्यातील आहे. यात क्वात्रोची मध्यस्थ नाही. जे बोफोर्स करीत राहिले व ज्यांच्या संरक्षण साहित्य खरेदी व्यवहारांत कमिशनची संस्कृती फोफावली त्यांना पारदर्शक व्यवहार समजणार नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPrakash Javadekarप्रकाश जावडेकर