शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी घेतली अलवर येथील बलात्कार पीडितेची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:45 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट अलवर येथे जात बलात्कार पीडितेची भेट घेतली.

जयपूर - राजस्थानमधील अलवर येथे एका महिलेवर तिच्या पतीसमोरच झालेल्या बलात्कार प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे. एकीकडे अलवर येथील बलात्कार प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. तर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट अलवर येथे जात बलात्कार पीडितेची भेट घेतली आहे. तसेच दोषींवर कारवाई करून पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये आपला पक्ष भाजपाप्रमाणे राजकारण करत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. अलवर येथील बलात्कार पीडितेची भेट घेतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, ''हा माझ्यासाठी राजकारण करण्यासाठीचा विषय नाही. तर भावनिक विषय आहे. मी येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, तर पीडितेची भेट घेण्यासाठी आलो आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पीडितेला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. मी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. त्यांच्यासोबत न्याय होईल. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल.''  दरम्यान, राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर पीडितेने सांगितले की, राहुल गांधी यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमची भेट घेतली. आमचे म्हणणे ऐकून घेतले. आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना दिले.''  राहुल गांधी हे बुधवारी अलवरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र खराब हवामानामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता. अखेर राहुल गांधी यांनी आज पीडितेची भेट घेतली. 26 एप्रिल रोजी दुचाकीवरून जात असताना या दलित दाम्पत्याला अडवून पतीसमोरच महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर यातील एका आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थानRapeबलात्कार