शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना किती कळतं?; अरुण जेटलींचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 21:21 IST

राहुल गांधींच्या टीकेचा अरुण जेटलींकडून मुद्देसूद समाचार

नवी दिल्ली: मोदी सरकारवर तोफ डागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अर्थमंत्री अरुण जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'राहुल गांधींना किती कळतं? त्यांना कधी समज येणार आहे? मध्य प्रदेशातील त्यांचं आजचं भाषण ऐकून माझ्या मनात हेच प्रश्न आले,' असं जेटलींनी फेसबुकवर लिहिलं आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राहुल यांनी मंदसौरमध्ये जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतरच्या सभेत त्यांनी मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. या हल्ल्याला आता जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे. अरुण जेटलींनी फेसबुकवर ब्लॉग लिहून राहुल गांधींच्या सर्व मुद्यांचा समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा, उद्योगपतींचं माफ करण्यात आलेलं कर्ज, बेरोजगारी या मुद्यांवरुन राहुल यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेचा जेटलींनी मुद्देसूद प्रत्युत्तर दिलं आहे. 'सरकारनं उद्योगपतींचं एकाही रुपयाचं कर्ज माफ केलेलं नाही. राहुल गांधी चुकीची माहिती देत आहेत. बँकांची देणी थकवणाऱ्या उद्योगपतींना दिवाळखोर घोषित करण्यात आलं असून त्यांची कंपन्यांमधून हकालपट्टी करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. या उद्योगपतींना यूपीए सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप झालं होतं,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. 

बुडित खात्यात गेलेल्या बँकांच्या कर्जावरुन राहुल गांधींनी केलेल्या टीकेलाही जेटलींनी उत्तर दिलं. 'बुडित खात्यात गेलेल्या कर्जाला यूपीए दोन सरकारचा कारभार जबाबदार आहे. सध्या मोदी सरकार कर्जाची वसुली करण्यास प्राधान्य देत आहे,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. देशात मोबाईल निर्मिती केंद्रांची संख्या कमी असल्याच्या राहुल यांच्या टीकेलाही जेटलींनी प्रत्युत्तर दिला. '2014 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेतून बाहेर गेलं, त्यावेळी देशात फक्त दोन मोबाईल निर्मिती केंद्रं होती. सध्याच्या घडीला देशात तब्बल 120 मोबाईल निर्मिती केंद्रं आहेत. यासाठी तब्बल 1 लाख 32 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे,' अशी आकडेवारी त्यांनी दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी