शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या रोड शोला प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:11 IST

वायनाडमधून भरला अर्ज : भावाला सहकार्य करा : प्रियांका

कलपेट्टा : केरळमधील वायनाड मतदारसंघातूनलोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत येथे गुरुवारी केलेल्या रोडशोला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.रोड शोमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितेला हेही होते. या रोडशोमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व सामान्य नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. राहुल व प्रियांका गांधी जनतेला अभिवादन करत होते. राहुल गांधी यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी हस्तांदोलन केले.

राहुल व प्रियांका यांची छबी लोक मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना दिसत होते. या रोड शोमध्ये काँग्रेस व इंडियन युनियन मुस्लीम लीग या दोन्ही पक्षांचे झेंडे फडकताना दिसत होते. राहुल गांधी यांनी जिथे उमेदवारी अर्ज दाखल केल्या त्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे दक्षिण भारतातील संस्कृती, भाषा, इतिहास यांना धोका निर्माण झाल्याची भावना जनतेमध्ये आहे. देशभरातीर जनतेला आश्वस्त करण्यासाठीच मी उत्तर व दक्षिण भारतातून एकाचवेळी निवडणूक लढवत आहे. राहुल गांधी हे अतिशय निर्भय आहेत, वायनाडच्या जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी नंतर ट्विटरवरून केले. प्रियांका यांनी म्हटले आहे की, माझा भाऊ हा माझा विश्वासू मित्रही आहे. ते वायनाडमधील मतदारांचा अपेक्षाभंग करणार नाहीत.डाव्यांवर टीका नाहीवायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे डावे पक्ष संतापले असून, त्यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. त्याबाबत विचारता राहुल म्हणाले की, त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला वा टीका केली तरी आपण मात्र डाव्या पक्षांवर अजिबात टीका करणार नाही.जनतेचा अवमान - इराणी : राहुल गांधी यांनी वायनाडमधून अर्ज दाखल करून अमेठीच्या जनतेचा अवमान केला आहे अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली. अमेठीमधून त्या भाजपतर्फे रिंगणात आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwayanad-pcवायनाड