अभाविपतर्फे राहुल गांधींचा निषेध
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:56+5:302016-02-02T00:15:56+5:30
जळगाव : हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी राजकारण करणार्या राहुल गांधी यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी टॉवर चौकात घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध नोंदवला.

अभाविपतर्फे राहुल गांधींचा निषेध
ज गाव : हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी राजकारण करणार्या राहुल गांधी यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी टॉवर चौकात घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध नोंदवला. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी एकत्र येत रोहित वेमुला याला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात तिळ गुळ घ्या गोड गोड बोला, विचारांची लढाई विचारांनी लढा, तुम कितने कार्यालय फोडोगे, हर घर मे कार्यालय बनायेंगे गलिच्छ राजकारण करणार्यांचा निषेध असो, अशी घोषणाबाजी केली. यावेळी महानगर मंत्री अमित पाटील, सहमंत्री कौस्तुभ पाटील, आंदोलन प्रमुख मानस शर्मा, श्रीनिवास पाटील, वेनु सरोदे, दिपक पाटील, मनोहर चौधरी, वैभव भावसार, ललित तोगे, अनंत शिंदे, सागर बाविस्कर उपस्थित होते.