शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 09:33 IST

टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे. 

कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने जबरदस्त राजकारण पेटले आहे.  राहुल गांधी यांनी 'कठुआ ते कोलकाता' विधान करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर तीन दिवसांनंतर, आता तृणमूलनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे. 

I.N.D.I.A. ब्लॉकमधील बहुतांश पक्षांनी न्यायाची मागणी करत या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उचललेल्या पावलांचे समर्थन केले आहे. मात्र याप्रकरणी राहुल गांधींनी यांनी टीएमसीवर निशाणा साधला आहे. "पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटे आहे.

कुणाल घोष यांचा राहुल गांधींवर पलटवार -कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत यांनी कथित जमीन वाटप घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. हाच धागा पकडत, एका बातमीचा फोटो पोस्ट करत, तृणमूलचे माजी राज्यसभा खासदार कुणाल घोष यांनी एक्सवर लिहिले, 'तर, राहुल गांधी जी, आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणार का? हा भ्रष्टाचाराचा एक मोठा आरोप आहेत. पश्चिम बंगालमधील घटनेच्या खऱ्या माहितीशिवाय, ममता बॅनर्जी यांनी उचललेल्या पावलांची माहिती नसताना, आपण सोशल मीडियावर भाष्य केले आहे. आता, आपण आपल्या मुख्यमंत्र्यासंदर्भात पावले उचलण्याची कृपा कराला?" 

काय म्हणाले होते राहुल गांधी? -राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते, "कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ज्याप्रकारे तिच्यासोबत क्रूर आणि अमानवी कृत्य घडले, त्यामुळे डॉक्टर आणि महिला वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर  प्रश्न निर्माण करतो." या घटनेने विचार करायला भाग पाडले आहे की, मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर पालकांनी कुठल्या भरवशावर आपल्या मुलींना बाहेर शिकायला पाठवायचे? निर्भया प्रकरणानंतर बनवलेले कडक कायदेही असे गुन्हे रोखण्यात अयशस्वी का आहेत?"

"हाथरस ते उन्नाव आणि कठुआ ते कोलकात्यापर्यंत महिलांवरील वाढत्या घटनांवर प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक घटकाला एकत्रितपणे गांभीर्याने चर्चा करून ठोस उपाययोजना कराव्या लागतील. या असह्य दु:खात मी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. त्यांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे" असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीdoctorडॉक्टरcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल