शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

राहुल गांधींची न्याय यात्रा पुन्हा रोखली, गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडले बॅरिकेड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 08:23 IST

गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी शहरातून जाणार होती. तथापि, प्रशासनाने परवानगी ...

गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी शहरातून जाणार होती. तथापि, प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे यात्रा शहराजवळ येताच पोलिसांनी ती अडवली. तेव्हा संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांनी बॅरिकेड्स तोडले.

मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी या घटनेला नक्षलवादी कृत्य संबोधत कार्यकर्त्यांना बॅरिकेड्स तोडण्यासाठी चिथावल्याबद्दल राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवले. मात्र, आम्ही कायदा मोडला नाही, असे राहुल म्हणाले. दुसरीकडे, मुख्यमंत्री सरमा यांनी या घटनेला नक्षलवादी कृत्य संबोधले.

यात्रा शहरात नको...पोलिसांनी कामकाजाच्या दिवसाचे कारण देत राहुल यांच्या यात्रेला शहरात प्रवेशास नकार दिला होता. यात्रा शहरात आल्यास वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल, असे कारण सांगून पोलिसांनी यात्रा राष्ट्रीय महामार्गावरून नेण्याचे निर्देश दिले होते. यात्रा शहराजवळ आल्यानंतर पोलिसांनी ती रोखल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बॅरिकेड्स तोडले. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या चकमकीत अनेक जण जखमी झाले. आसाम सरकारच्या या कृत्याचा देशभरात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस