शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या वादात राहुल गांधींची उडी, ट्विट करत मोदींवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 13:28 IST

फेसबुक डेटा लीकप्रकरणी आता भारतात जोरदार राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे.

नवी दिल्ली- फेसबुक डेटा लीकप्रकरणी आता भारतात जोरदार राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे. राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, इराकमध्ये 39 भारतीयांच्या झालेल्या हत्येवरून लक्ष विचलित करण्यासाठीच फेसबुकच्या डेटा लीकची गोष्ट समोर आणली गेली आहे.इराकमध्ये 39 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. सरकारचा खोटेपणा उघड झाल्यानं ते अडचणीत सापडले आहेत. सरकारनं यातून स्वतःचा बचाव करायचा असल्यानं काँग्रेसचा फेसबुक डेटा लीक प्रकरणात हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी लोकांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या आरोपामुळे फेसबुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.यादरम्यान फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डेटा चोरीप्रकरणी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत मौन सोडलं होतं. डेटा चोरी प्रकरणात कंपनीकडून आतापर्यंत अनेक पावलं उचलण्यात आली आहेत आणि यापुढेही कठोर पावलं उचलली जातील. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन देत झुकेरबर्ग यांनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणात झालेली आपली चूक मान्य केली आहे. झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFacebookफेसबुक