शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

राहुल गांधींची सुट्टीची वेळ चुकलीच - दिग्विजय सिंह

By admin | Published: February 24, 2015 10:26 AM

राहुल गांधी यांना सुट्टीसाठी योग्य वेळ वेळ निवडता आली असती असे सूचक विधान करत दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ -  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याने वाद निर्माण झाला असतानाच काँग्रेस नेते आणि राहुल गांधींचे कट्टर समर्थक दिग्विजय सिंह यांनीदेखील सुट्टीवरुन काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. राहुल गांधी यांना सुट्टीसाठी योग्य वेळ वेळ निवडता आली असती असे सूचक विधान करत दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होत असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.  यात भर म्हणजे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राहुल गांधी सुट्टीवर गेल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या अधिवेशनात पक्षाच्या उपाध्यक्षानेच सुट्टीवर जाणे अयोग्य असल्याची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे राहुल गांधीच्या सुट्टीविषयी भाष्य केले. दिग्विजय म्हणतात, पक्षाच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी राहुल गांधी सुट्टीवर जात असतील तर यात गैर काहीच नाही. फक्त या सुट्टीसाठी योग्य वेळ निवडण्याची गरज होती. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून राहुल गांधी यांच्या सुट्टीवर टीका केली. राहुल गांधी यांच्या सुट्टीने देशाला काहीच फरक पडत नाही. पण पक्षाच्या भावी अध्यक्षाने महत्त्वाच्या वेळी सुट्टीवर जाऊन पक्ष, देशहित आणि संसदीय कामकाजात किती निष्काळजी आहोत हेच जनतेला दाखवून दिले असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.