शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

राहुल यांची ED चौकशी: राहुल गांधींकडे 16 कोटींची संपत्ती, स्वतःची कार नाही; 72 लाखांचं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:12 IST

सध्या अंमलबजावणी संचालनालय (ED) नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. हे प्रकरण तब्बल 2 हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे आहे.

सध्या अंमलबजावणी संचालनालय (ED) नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. हे प्रकरण तब्बल 2 हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे आहे. काँग्रेसने आपल्या पक्षनिधीतून या वृत्तपत्राला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले होते.

ईडी राहुल गांधी यांच्याकडे त्यांच्या संपत्तीसंदर्भातही विचारणा करत आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राहुल यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, त्यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांची संपत्ती आणि 72 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे म्हटले गेले आहे. याच प्रतिज्ञापत्रानुसार आज आम्ही आपल्याला राहुल गांधी यांच्या संपत्तीसंदर्भात माहिती देत आहोत. 

राहुल गांधी यांच्याकडे 15 कोटींहून अधिकची संपत्ती - - 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांपेक्षाही अधिक संपत्ती आहे. 2014 मध्ये त्यांची संपत्ती 9.4 कोटी होती.- राहुल गांधी यांच्यावर 72 लाख रुपयांचे कर्जही आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची कारही नीही.- राहुल गांधी यांची चल संपत्ती 5 कोटी 80 लाख 58 हजार 799 रुपये आणि अचल संपत्ती 10 कोटी 8 लाख 18 हजार 284 रुपये एवढी आहे.- त्यावेळी त्यांच्याकडे 40 हजार रुपये कॅश आणि 17 लाख 93 हजार रुपये वेगवेगळ्या बँकांमध्ये होते.- त्यावेळी त्यांनी 5 कोटी 19 लाख रुपये बॉन्ड, शेअर म्यूच्युअल फंडमध्ये इंव्हेस्ट केले होते.- सुल्तानपूरमध्ये वारशाने मिळालेल्या शेतीत त्यांचा वाटा आहे.- राहूल गांधी यांच्याकडे तेव्हा 333.3 ग्रॅम सोने होते.- 2017-18 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 11 लाख 85 हजार 570 रुपये एवढे होते.

राहुल गांधी यांच्या उत्पन्नाचे सोर्स -- खासदार म्हणून मिळणारी सॅलरी- रॉयल्टी इन्कम- रेंटल इन्कम- बॉन्ड्समधून मिळणारे व्याज- म्युच्युअल फंड्समधून मिळणारे डिव्हिडन्स आणि कॅपिटल गेन

50 लाख रुपयांच्या शेअर्ससाठी पैसे कसे जमवले? ED नं राहुल गांधींना केले असे प्रश्न - -आपली संपत्ती कुठे-कुठे आहे? परदेशात काही संपत्ती आहे का? जर असेल, तर कुठे आणि किती?- एजेएलमध्ये आपली भूमिका काय होती आणि आपण यंग इंडियाशी कसे जोडले गेलात? -आपण यंग इंडियाचे संचालक कसे झालात? कंपनी केव्हा आणि किती रुपयांत स्थापन केली?- यंग इंडिया AJL चे टेकओव्हर करू शकते?- आपण AJL चे 50 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले, यासाठी पेमेंट कशा पद्धतीने करण्यात आले होते?- यात आपला वाटा किती होती? आपण आपले शेअर्स कसे आणि किती रुपयांत खरेदी केले? यासाठी पैसे कुठून आले?- AJL टेक ओव्हर केल्यानंतर तिच्यावरील 90.9 कोटी रुपयांचे कर्ज माफ का केले?- काँग्रेसने नॅशनल हेराल्डला 90.9 कोटी रुपयांचे कर्ज दिले, पण आपण शेअर्स मात्र आपल्या नावाने घेतले?- नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन करण्यामागचा हेतू काय होता?

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेस