शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्रीजी एकदा तरी पत्रकार परिषदेत बोला, राहुल गांधींचे मोदींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 09:22 IST

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली

ठळक मुद्दे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही.मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केलीमोदींना पंतप्रधान होऊन इतके दिवस लोटले आहेत. आतातरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याचा आनंद लुटावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले

हैदराबाद - नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली असून, मोदींना पंतप्रधान होऊन इतके दिवस लोटले आहेत. आतातरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याचा आनंद लुटावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे. राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्यावरून टोला लगावला. हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करणारे एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले की,'' प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आता तुम्हाला पंतप्रधानपदाच्या पार्ट टाइम कमासाठी वेळ मिळेल,अशी अपेक्षा करतो. तुम्हाला पंतप्रधान होऊन 1 हजार 654 दिवस झालेत पण आतापर्यंत तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली नाही. हैदराबाद येथील माझ्या पत्रकार परिषदेची काही छायाचित्रे मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. एखाद दिवस प्रयत्न करा, प्रश्नांच्या सरबत्तीचा सामना करणे मजेशीर असते,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. तेलंगणामधील प्रचार आटोपल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण