शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

'चौकीदार की दाढ़ी में तिनका', राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 14:11 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 'चौकीदार की दाढी मे तिनका' असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणावरुन वारंवार केंद्र सरकारला धारेवर धरणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना, तेथील एका प्रकल्पाचा उल्लेख करत त्यामध्ये फसवणूक केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.  

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर फिल्मी स्टाईलमध्ये आरोप केले आहेत. राहुल गांधींना असा दावा केला आहे की, ''इंफ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनेंशियल सर्व्हिसेज (IL&FS) कंपनीला 2007मध्ये नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा गिफ्ट सिटी नावाचा प्रकल्प दिला. मात्र या प्रकल्पांतर्गत कोणतेही काम झाले नाही, उलट याद्वारे फसवणूकच झाली''.

आयएलअँडएफएसमध्ये 40 टक्के हिस्सा एलआयसी, एसबीआय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी संस्थांचा आहे. यावरुन काँग्रेसनं काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्या कंपनीमध्ये 40 टक्के सरकारी कंपन्यांचा हिस्सा आहे, त्यावर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज कसे वाढले?, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

(Rafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले')

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चहुबाजूंनी टीकास्त्र सोडत आहेत. यापूर्वीही राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवताना, देशाचे चौकीदारच भ्रष्टाचारी आणि चोर निघाले, असा सनसनाटी आरोप केला. मोदी यांनी देशातील जनता व सैनिकांचा विश्वासघात केला असून, सैनिकांच्या खिशातून पैसा काढून अनिल अंबानी यांचा खिसा भरला, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील