हुकूमशाहांना स्वीकारणार नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

By Admin | Updated: January 26, 2017 16:01 IST2017-01-26T10:22:52+5:302017-01-26T16:01:20+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आरएसएसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

Rahul Gandhi will not accept dictatorship | हुकूमशाहांना स्वीकारणार नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हुकूमशाहांना स्वीकारणार नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आरएसएसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला, याचा अर्थ देश कोणत्याही अधिका-यांच्या वागणुकीतील लहरीपणा किंवा हुकूमशहांना स्वीकारणार नाही.  
 
राहुल गांधी यांनी म्हटले की, देशाने संविधान स्वीकारले असून याचा अर्थ देशात कोणावरही कोणतीही विचारधारा थोपवली जाणार नाही. 'आजच्या दिवशी, जेव्हा संविधानानुसार स्वातंत्र्य संग्रामाची घटनात्मक तत्त्वे आणि मूल्यांचा स्वीकार केला गेला, त्यामुळे कोणत्याही अधिका-याच्या वागण्यातील लहरीपणा किंवा हुकूमशाही चालणार नाही.  
 
सर्वांना स्वशासनाचा अधिकारी असून कमजोरातील कमजोर व्यक्तीचाही आवाज ऐकला जाईल, या मागे अशी भावना आहे की प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेचा आदर केला जाईल. भारताच्या यशाचे श्रेय प्रत्येक व्यक्तीला जाते. प्रत्येक भारतीयाचा आवाज आपली ताकद आहे आणि आपल्याला हे विसरुन चालणार नाही, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाह असल्याचा हल्लाबोल केला आहे. 
 

Web Title: Rahul Gandhi will not accept dictatorship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.