शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

केंद्र सरकारमधील ३० लाख रिक्त पदे भरणार - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:29 IST

राहुल गांधी; युवकांच्या ॲप्रेन्टिसशिपसाठी करणार कायदा

तिरुनेलवेली : सरकारी सेवेतील ३० लाख रिक्त पदे भरण्यासाठी तसेच युवकांना प्रशिक्षणार्थी (ॲप्रेन्टिसशिप) म्हणून काम मिळवून देण्याकरिता कायदा करू, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. 

तामिळनाडूमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत सत्तेत आल्यास तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करणार आहोत. सरकारी सेवेमध्ये ३० लाख पदे रिक्त आहेत. युवकांना या पदांवर भरती करून घेण्याची मोहीम राबविण्यात येईल. सर्व पदवीधर, डिप्लोमाधारकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ठोस पावले उचलणार आहोत. त्यासाठी ‘प्रशिक्षणार्थी असण्याचा हक्क’ प्रदान करणारा कायदा संसदेत मंजूर केला जाईल.

देशात सध्या दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरूराहुल गांधी यांनी म्हटले की, पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव आहे. याआधी भारताकडे आदर्श लोकशाही राष्ट्र म्हणून सारे जग पाहात होते. मात्र, आता भारतामध्ये लोकशाहीला अर्थ उरलेला नाही, असे जगाचे मत बनले आहे.आर्थिक स्रोत व माध्यमांसह सर्व गोष्टींवर आपली मक्तेदारी निर्माण करण्याचे मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. देशात सध्या दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरू आहे. एका बाजूला सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समानता यांच्याविषयी आदर बाळगणारे लोक व दुसऱ्या बाजूस मोदी, रा. स्व. संघ यांची विचारसरणी असा हा लढा आहे.

मोदींकडून एक नेता, एक भाषा तत्त्वाचा पुरस्कारnकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, एक देश, एक नेता, एक भाषा या तत्त्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्कार करतात.nतामिळनाडूमध्ये पेरियर, सी. एन. अण्णादुराई, कामराज, एम. करुणानिधी अशी दिग्गज माणसे कार्यरत होती. nसामाजिक न्यायाचे तत्व या राज्याने पाळले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीjobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस