शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

1984च्या दंगलीदरम्यान राहुल गांधी शाळेत होते, त्यांना जबाबदार धरणं चूकच- अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 22:04 IST

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चंदीगड- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 1984च्या दंगलीच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप करणं चुकीचं आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. 1984च्या शीख दंगलीत राहुल गांधी भागीदार होते, असा आरोप  सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अमरिंदर सिंग यांनी अकाली दलावर जोरदार हल्लाबोल केला.ऑपरेशन ब्लू स्टारच्या दरम्यान राहुल गांधी शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत होते. त्यामुळे राहुल गांधींना आरोपी ठरवणं योग्य नाही. ज्यावेळी राहुल गांधींना याबाबत समज नव्हती, त्या घटनेसाठी त्यांना जबाबदार धरणं अयोग्य आहे. दंगलीतल्या आरोपींवर कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणालेत. राहुल गांधींनी 1984च्या दंगलीचा निषेध नोंदवला होता. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या पक्षाला जबाबदार धरणे मूर्खपणाचे ठरेल.सुखबीर सिंग बादल यांचं हे विधान अज्ञानातून आले आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. आपचे नेते एच. एस. फुल्का यांनीही काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे. शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नसल्याचं राहुल गांधींचं विधान बेजबाबदारपणाचं आहे. राहुल यांनी या विषयावर आपल्याशी खुली चर्चा करावी, असंही आव्हानही फुल्का यांनी दिलं आहे. 1984ची शीख दंगल राजीव गांधींच्या इशाऱ्यामुळेच घडल्याचा आरोपही फुल्का यांनी केला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेस1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगल