शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

'26/11 हल्ल्याच्या वेळी राहुल गांधी नाच-गाणं करत होते'; मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:24 IST

''26/11 हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी परवानगी मागिती होती. पण, तत्कालीन काँग्रेस सरकारने ती परवानगी दिली नाही.''

नवी दिल्ली:काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचे नवीन पुस्तक  '10 Flash Points; 20 Years - National Security Situations that Impacted India' यामध्ये त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर मुंबईतील 26/11 च्या घटनेवरुन निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपनेही काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर त्याच 26/11 च्या हल्ल्यावरुन टीका केली आहे.

काँग्रेसच्या अपयशाची कबुली-भाजपयाला काँग्रेसच्या अपयशाची कबुली म्हणणे योग्य ठरेल, असे मत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते  म्हणाले, प्रत्येक भारतीयाप्रमाणे आम्हालाही खूप वेदना होत होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर भारताच्या अखंडतेची चिंता नव्हती. सोनिया-राहुल त्यांचे मौन तोडणार का? सोनिया गांधींना प्रश्न आहे की त्यांनी भारतीय सैन्याला खुले स्वातंत्र्य आणि परवानगी का दिली नाही? या प्रश्नाची उत्तरे जाणून घेणे देशासाठी महत्त्वाचे असल्याने भाजप हा प्रश्न उपस्थित करत आहे, असे ते म्हणाले. 

राहुल गांधी नाच-गाणं करत होतेते पुढे म्हणाले की, काँग्रेसने शहीदांच्या हौतात्म्याची खिल्ली उडवली. सोनिया गांधी तुम्हाला सांगावे लागेल की, लष्कराला तेव्हा परवानगी का दिली नाही ? आमच्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का? जेव्हा आपल्या देशावर हल्ला होत होता, तेव्हा राहुल गांधी सकाळपर्यंत नाच-गाणं करत होते, अशी बातमी एका वर्तमानपत्रात आली होती. काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, इम्रान खान आमचे मोठे भाऊ आहेत. देश राहुल गांधींना विचारतोय की आमच्या पोलीस आणि कमांडोंनी दिलेल्या हौतात्म्याचा बदला पाकिस्तानकडून घेण्यात तुम्हाला यश का आले नाही ? पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने भारताची ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे. उरीमध्ये पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चपराक दिली होती, हे लक्षात ठेवा.

सैन्य मनमोहन सिंगांकडे परवानगी मागत राहिली-भाजप

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आमचे लष्कर मनमोहन सिंग यांच्याकडे परवानगी मागत होते, पण काँग्रेसने परवानगी दिली नाही. असं काय झालं होतं, की सोनिया गांधींनी सैन्याला परवानगी दिली नाही ? पुलवामा हल्ल्यावर आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले. पण 26/11 च्या हल्ल्यानंतर काँग्रेसने लष्कराला परवानगी दिली नाही नाही, असा हल्लाबोल भाटिया यांनी केला.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी