शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी रिकामा केला बंगला, सामानाचा ट्रक निघाला; सोनिया गांधींच्या घरी शिफ्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 17:57 IST

Rahul Gandhi Vacating House: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आपला सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती.

Rahul Gandhi Vacating House: खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांचे शासकीय निवासस्थान रिकामं करण्याची नोटीस मिळाली होती. त्यामुळे त्यांनी आपलं निवासस्थान रिकामं करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (14 एप्रिल) त्यांच्या घरातून सामान भरलेला ट्रक बाहेर पडताना दिसला. ही सामानाची पहिली खेप आहे की शेवटची, याबाबत माहिती मिळालेली नाही.

राहुल गांधी इतक्या वर्षांपासून दिल्लीतील 12 तुघलक लेनमधील बंगल्यात राहायचे. आता हा बंगला रिकामा केल्यानंतर ते आई आणि यूपीए चेअरपर्सन सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ रोडवरील घरात शिफ्ट होणार आहेत. 

मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेप्रकरणी राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी सुरत न्यायालयानं दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. हाऊस कमिटीने 27 मार्च रोजी राहुल गांधींना एक महिन्याच्या आत घर रिकामे करण्याची नोटीस दिली. त्यामुळे आता त्यांनी घर रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी सूरत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. 20 एप्रिल रोजी त्यावर निर्णय येईल.

राहुल गांधींची केंद्रावर टीका...बुधवारी केरळमधील वायनाड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, '50 वेळा माझे घर जप्त करा, पण मी जनतेचे प्रश्न मांडत राहीन. तुम्ही लोकांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्यासाठी लढेन. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. अदानीबाबत मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचराल, पण त्यांनी उत्तर दिले नाही.'

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसdelhiदिल्लीBJPभाजपा