शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निकालानंतर राहुल गांधी २ दिवसांच्या सुट्टीवर, मित्रांसह जैसलमेर दौऱ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 11:27 IST

rahul gandhi : राहुल गांधी पहिल्या दिवशी येथील सूर्यगड किल्ल्यावर मुक्काम करतील आणि दुसर्‍या दिवशी वाळवंटात तंबूत राहणार आहेत.

ठळक मुद्देराहुल गांधींचा हा दौरा गोपनीय असणार आहे. मंगळवारी राहुल गांधींचे सुरक्षा पथक जैसलमेरला पोहोचल्यानंतर त्यांनी हॉटेलला भेट दिली आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.

जयपूर : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या मित्रांसह सुट्टीसाठी बुधवारी जैसलमेरला पोहोचले आहेत. राहुल गांधी जैसलमेरमध्ये दोन दिवस मुक्काम करणार आहेत. यासाठी तयारी सुरू आहे. येथील प्रशासनाला दहा लोकांच्या व्हीआयपी मूव्हमेंटची तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. राहुल गांधी पहिल्या दिवशी येथील सूर्यगड किल्ल्यावर मुक्काम करतील आणि दुसर्‍या दिवशी वाळवंटात तंबूत राहणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम सोमवारी ठरविण्यात आला आहे.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी पहाटे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी खासगी विमानाने जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ जैसलमेर येथे दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांचा हा दौरा अतिशय गुप्त ठेवला जात आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली असून त्यांचे सीआरपीएफचे सुरक्षा पथक जैसलमेरला पोहोचले आहे. तसेच, राहुल गांधींनी  येथील स्थानिक काँग्रेस नेत्यांना आपले स्वागत करण्यास नकार दिला आहे. याशिवाय, हॉटेल परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी बुधवारी पहाटे नवी दिल्लाहून साडे सहा वाजता जैसलमेरच्या विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरून राहुल गांधी हे साम रोड येथील पंचतारांकित हॉटेल सूर्यगड किल्ल्याकडे रवाना झाले. जैसलमेरमध्ये राहुल गांधी एक रात्र वाळवंटातील तंबूत घालवणार आहे. यासाठी खास तंबू बनविण्यात येत आहेत. याचबरोबर, राहुल गांधी आपल्या या प्रवासादरम्यान उंट सवारी करतील. राजस्थानी पारंपारिक लोक संगीत नृत्याचा आनंद घेतील. 

राहुल गांधींचा हा दौरा गोपनीय असणार आहे. मंगळवारी राहुल गांधींचे सुरक्षा पथक जैसलमेरला पोहोचल्यानंतर त्यांनी हॉटेलला भेट दिली आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही संभाव्य मुक्काम असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, शुक्रवारी राहुल गांधी हे नवी दिल्लीला परतणार आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस