शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 06:00 IST

अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत.

- हरिश गुप्ताअमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये पराभव व्हावा म्हणून भाजपने जंगजंग पछाडले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा या मतदारसंघात झाल्या. पण भाजपच्या या डावपेचांवर मात करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत.अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत. इराणी यांना उत्तर प्रदेशच्या सरकारी यंत्रणेचेही मोठे पाठबळ लाभले आहे. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांच्या लखनौऊ वा अन्य राज्यांतून आलेल्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.‘चौकीदार चोर है' असा घणाघात राहुल गांधी यांनी केल्यामुळे त्यांच्यावर नरेंद्र मोदी संतापले आहेत. या प्रचारामुळे भाजप चिंताग्रस्तही झाला आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसला सत्ता मिळता मिळता राहिली. मध्य प्रदेश, राजस्थान, विधानसभेत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. राहुल यांनी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला तर प्रियांका यांनीही प्रचारात चैतन्यही आणले.अमेठीबरोबरच राहुल यांनी केरळच्या वायनाडमधूनही अर्ज भरुन त्यांना हरविण्याचे भाजपचे डावपेच उधळून लावले. प्रियांका यांनी अमेठीत पाच दिवसांच्या दौरा करून मोदी सरकारवर कडक टीका केली. राहुल यांनीही अमेठीचा पाच दिवसांचा दौरा केला. याआधी गांधी घराण्यातील कोणाही व्यक्तीने निवडणूक काळात एकाच मतदारसंघात इतक्या दिवसांचा दौरा केला नव्हता.

मोदींकडून विद्वेषी प्रचार - राहुल गांधीनवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अजय माकन उभे असून तेथील मतदानकेंद्रात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मतदान केले. राहुल गांधी यांनी मतदानानंतर केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लोकशाही वाचविण्यासाठी आमचा संघर्ष सुरू असून त्यादृष्टीने या लोकसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. देशहित लक्षात घेऊनच मी आज मतदान केले आहे. बेरोजगारी, शेतीचे गंभीर बनलेले प्रश्न, नोटाबंदी, राफेल खरेदी व्यवहारातील घोटाळा या प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठविला आहे. मोदींनी मात्र विद्वेषी प्रचार चालविला आहे. आम्ही मात्र मत्सरावर प्रेमानेच मात करू.

अखिलेश यांचे आवाहन : राहुल गांधी यांनाच मतदान करा असे आव्हान करण्याची विनंती काँग्रेसतर्फे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना करण्यात आली होती. अमेठी व रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवारालाच मतदान करावे असा आदेश मायावतींनी बसपच्या कार्यकर्त्यांना दिला होता. याबद्दल या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधी यांनी आभार मानल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :amethi-pcअमेठीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019