शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान मोदी चीनच्या पुलाचंही उदघाटन करतील याचीच भीती'; राहुल गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 18:32 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेच्याजवळ (LAC) लडाखच्या पेंगाँग त्सो सरोवरावर अनधिकृतरित्या पुलाचं बांधकाम केलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- 

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेच्याजवळ (LAC) लडाखच्या पेंगाँग त्सो सरोवरावर अनधिकृतरित्या पुलाचं बांधकाम केलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. चीनकडून केल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधी यांनी याआधी उपस्थित केला होता. आता राहुल गांधी यांनी चीनच्या अनधिकृत कारनाम्याचा फोटोच जारी करत केंद्र सरकार आणि विशेषत: मोदींवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून लडाखमध्ये पेंगाँग सरोवरावर चीनकडून पूल बांधला जात असल्याचा एक फोटो ट्विट केला आहे. चीनच्या कारनाम्यांवर मोदींनी साधलेल्या मौनव्रतामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीला अतिक्रमण करण्यासाठीचं प्रोत्साहनच मिळत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच आता आपले पंतप्रधान कदाचित चीनच्या या पुलाचंही उदघाटन करतील की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे, असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे. 

चीनकडून पेंगाँग सरोवरावर एका पुलाचं बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाचं ४०० मीटरहून अधिक बांधकाम पूर्ण देखील झालं आहे. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर चीनला संबंधित परिसरात प्राबल्य वाढवता येईल असं सांगितलं जात आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील एक महत्त्वपूर्ण बिंदू ठरणारं हे ठिकाण असल्याचं देखील म्हटलं जात आहे. चीन बांधत असलेला पूल ८ मीटर रुंद असून पेंगाँगच्या उत्तर तटावर असलेल्या चीनी सैन्याच्या फिल्ड बेसपासून दक्षिणेकडे  याचं निर्माण कार्य सुरू आहे. याची ठिकाणी २०२० साली भारत आणि चीनमध्ये होणारी बाचाबाची व तणाव लक्षात घेता सैनिकांना राहण्यासाठी तात्पुरते तंबू बांधण्यात आले होते. तसंच प्राथमिक उपचार केंद्र देखील उभारण्यात आली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी