शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

“मोदीजी… हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया दोन्ही सोबत राहू शकत नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:31 IST

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी काही जागतिक ब्रँड्सनं भारतातून काढता पाय घेतला यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. मेक इन इंडिया आणि हेट इन इंडिया सोबत राहू शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. तसंच त्यांनी देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरूनही निशाणा साधत विनाशकारी बेरोजगारी संकट असा उल्लेख करत त्यावर लक्ष देण्याची आवाहनही केलं. 

भारतात ज्या कंपन्या काम करत होत्या त्या बाहेर निघून गेल्या. ७ जागतिक ब्रँड, ९ फॅक्ट्रीज, ६४९ डिलरशीप, ८४ हजार नोकऱ्या,” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं. मोदीजी हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया सोबत राहू शकत नाही. याशिवाय भारतातील विनाशकारी बेरोजगारी संकटावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय त्यांनी ट्विटरवर काही जागतिक ब्रँड्सचे फोटोही शेअर केले आहे. यात २०१७ मध्ये शेवरले, २०१८ मध्ये ट्रक्स, २०१९ फिएट आणि युनायटेड मोटर्स, २०२० मध्ये हार्ले डेविडसन, २०२१ मध्ये फोर्ड आणि २०२२ डॅटसन सारख्या कंपनींचे फोटो दाखवण्यात आले आहेत. यापूर्वी मंगळवारीही राहुल गांघी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे ४५ कोटींपेक्षा अधिक लोकांनी नोकरी मिळवण्याची अपेक्षा गमावली असल्याचा आरोप त्यांनी केला. असं करणारे ७५ वर्षांमधील ते पहिले पंतप्रधआन आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले. “नव्या भारताची घोषणा, प्रत्येक घरात बेरोजगारी. ७५ वर्षांमधील मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे ४५ कोटीपेक्षा अधिक लोकांनी नोकरी मिळवण्याची अपेक्षा गमावली आहे,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं होतं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत