""राहुल गांधींनी अमेठीच्या 4 जागा जिंकून दाखवाव्या""

By Admin | Updated: June 4, 2017 11:10 IST2017-06-04T11:05:07+5:302017-06-04T11:10:07+5:30

तेलंगणाचे मंत्री के टी रामा राव यांनी कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान दिलं आहे. राहुल गांधींनी तेलंगणा विधानसभा निवडणुका जिंकण्याआधी

"Rahul Gandhi should win 4 seats in Amethi" | ""राहुल गांधींनी अमेठीच्या 4 जागा जिंकून दाखवाव्या""

""राहुल गांधींनी अमेठीच्या 4 जागा जिंकून दाखवाव्या""

>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - तेलंगणाचे मंत्री के टी रामा राव यांनी कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी तेलंगणा विधानसभा निवडणुका जिंकण्याआधी स्वतःचं संसदीय क्षेत्र अमेठी येथील विधानसभेच्या 4 जागा जिंकून दाखवाव्या असं म्हणत रामा राव यांनी शनिवारी एकप्रकारे राहुल यांना आव्हानच दिलं.  
 
बालनगर येथील एका कार्यक्रमात रामा राव यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस अपयशी ठरली आहे. जनता राहुल गांधींना विसरली आहे. राहुल गांधींचा हारण्याचा रेकॉर्ड पाहता राजकारणाशी त्यांची विसंगती असल्याचं दिसतं असं ते म्हणाले.  
 
तेलंगणा राज्याची निर्मीती केवळ कुटुंबाच्या फायदयासाठी झालीये का असा सवाल राहुल यांनी 1 जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना केला होता. राज्य सरकार चुकीच्या दिशेने काम करत आहे त्यामुळे  तीन वर्षात तेलंगणाच्या जनतेची स्वप्नं पूर्ण होऊ शकली नाहीत असंही राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या टीकेला प्रत्युत्र देताना रामा राव यांनी राहुलवर पलटवार केला आहे. 
 

Web Title: "Rahul Gandhi should win 4 seats in Amethi"