‘राहुल गांधी व्हावेत पक्षाध्यक्ष’
By Admin | Updated: November 9, 2015 22:58 IST2015-11-09T22:56:28+5:302015-11-09T22:58:10+5:30
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी भावना आता जोर धरू लागली आहे

‘राहुल गांधी व्हावेत पक्षाध्यक्ष’
नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी भावना आता जोर धरू लागली आहे. काँग्रेस सरचिटणीस सी.पी. जोशी यांनी सोमवारी याबाबतची मागणी पुढे रेटली. जोशी हे पक्षाचे बिहारमधील प्रभारी आहेत.
एका पत्रपरिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सांभाळावे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.
राहुल यांनी बिहार निवडणुकीत महाआघाडी साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असे सांगत जदयू नेते नितीशकुमार यांनी महाआघाडीला नेतृत्व दिले, राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी महाआघाडीस शक्ती दिली, असे जोशी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)