शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Rahul gandhi : 'शिवसेनेचं 100 टक्के खरंय, राहुल गांधींना PM पदाचे उमेदवार घोषित करावं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:59 IST

Rahul gandhi : आगामी काळात पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील 'रोखठोक' या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये राऊत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची तुलना पुन्हा एकदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.

मुंबई - देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अद्यपही कायमस्वरुपी अध्यक्ष मिळालेला नाही. तसेच, काँग्रेसकडून 2024 च्या निवडणुकांसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून कुठलाही चेहरा दिला नाही. त्यामुळे, काँग्रेसच्या राजकीय रणनितीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यातूनच, प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनाही पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जाते. यावरुनच, आता बॉलिवूड अभिनेता केआरकेनं शिवसेनेच्या मताशी सहमती दर्शवली आहे.

आगामी काळात पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच, सन २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील चेहरा कोण असेल यावर विरोधी पक्षांचं अद्याप एकमत होताना दिसत नाही. पण शिवसेनेनं राहुल गांधी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दावेदारी नाकारताना शिवसेनेनं तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांना खेळ बिघडवणारे पक्ष म्हणून टीका केली आहे. अभिनेता केआरके यांनीही शिवसेनेची री ओढली असून शिवसेनेच्या मताशी 100 टक्के सहमत असल्याचं केआरकेनं म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करायला हवं. भारताचे पंतप्रधान बनण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या प्रादेशिक पक्षाचे नेते पुरेसे नाहीत, असे केआरके यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

राहुल गांधी हेच भाजपला रोखणारे नेते

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील 'रोखठोक' या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये राऊत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची तुलना पुन्हा एकदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. लखीमपूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला तसेच त्यांच्या कार्यपद्धतीत इंदिरा गांधी यांची झलक दिसते असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे एकमेव असे नेते आहेत जे दिल्लीतील भाजप सरकारला मजबूत पर्याय ठरु शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीbollywoodबॉलिवूडMamata Banerjeeममता बॅनर्जी